रक्तदान शिबीर २०२३
नमस्कार,
आपल्याच चित्पावन बंधूभगिनी यांच्यासाठी आपण वर्षभर अनेक कार्यक्रम करत असतो तसेच समाजातील इतर घटकांसाठी आपण अनेक मदतकार्य करत असतो. तसेच समाजातील घटक सुद्धा आपल्याला रक्तदान शिबीरासारख्या उपक्रमात हातभार लावतात.
रक्तदान हा असाच एक उपक्रम आहे. दोन वर्षापूर्वी जुलै मध्ये हेच शिबिर घेतले होते पण आत्ता रूग्णालयात रक्ताची कमतरता आहे असे कळल्यावर आपण लगेचच या शिबिराचेच आयोजन केले. मागच्या वेळेपेक्षा यंदा नावनोंदणी ही कमी झाली व कमी लोकांनी रक्तदान केले. वारंवार याविषयी पोस्ट टाकून ही उपस्थिती कमी होती याबद्दल कोअरकमिटीला नक्कीच वाईट वाटले असो. पुढच्या वर्षी जास्त लोक येतील या आशेवर आजचा दिवस संपला .
जनकल्याण रक्तपेढी व चित्पावन परिवार कोथरूड आयोजित रक्तदान शिबिरात आज शिबिरासाठी ४० जण रक्तदान करायला आले होते त्यापैकी ३५ जण रक्तदान करू शकले. सर्वांचे धन्यवाद. समाजाप्रती दाखविलेल्या बांधिलकीबद्दल सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन!
चित्पावन परिवार कोथरूड कार्यकारिणी समिती