हुरडा पार्टी 2023
चित्पावन परिवार कोथरूड चा सातवा वर्धापनदिन
चित्पावन परिवार कोथरूड च्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त एकदिवसीय हुरडपार्टीचे आयोजन मनाली ऍग्रो फार्मला आयोजित करण्यात आले होते. सकाळी सगळे अगदी कोकणस्थी वेळेवर तर काही वेळेच्या आधीच जमले होते. बस त्यांचीच असल्याने वेळेवर पोचलो. गरमागरम उपमा आणि पोहे असा नाश्ता झाल्यावर संगीतखुर्ची, अंताक्षरी, रेनडान्स झाल्यावर मस्त पिठलं, भाकरी, वांग्याचा रस्सा आणि इंद्रायणी तांदुळाच्या भातावर ताव मारला.जे जोडीने आले होते त्यांनी छान उखाणेही घेतले कोणी पत्ते, कोणी कॅरम तर कोणी म्हणजे आम्ही पंचेचाळीशीतल्या मुली वामकुक्षी घेण्यात रमलो होते. ते म्हणजे असं झालं की तरण्या झाल्यात बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्यात हरण्या सगळ्या सत्तरी ओलांडलेल्या तरुणी सगळ्या खेळात उत्साहाने भाग घेत होत्या, झोपाळ्यावर झुलत होत्या, गाणी म्हणत होत्या एकूण काय तर enjoy करत होत्या सगळ्यांनी बैलगाडीची सैर तर केलीच पण त्यावर वेगवेगळ्या प्रकारे फोटोसेशन पण केले सरतेशेवटी सगळ्यांनी चटणी, गुळासोबत हुरड्यावर ताव मारला आणि परतीच्या प्रवासाला लागलो.